Archive for जून, 2007

मराठी विनोद ..!

जून 19, 2007

फोनची बेल वाजते. (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो.)

पहिला(फोन करणारा पुणेरी) : हेलौ..

दुसरा : बोला.

पहिला : देशपांडे आहेत का ?

दुसरा(चिडून) : नाही, ते ‘पावन खिंडीत’ लढतायेत!

पहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले. आता मेलात तरी चालेल.

(फोन बंद)

हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..

आभारसचिन ..!

पहिला पाऊस पडतो तेंव्हा…..

जून 1, 2007
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं…
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ

पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्यापाशी
तळं होऊन साचायचं!

आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील

ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!

म्हणून…
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं…
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

पहिल्या पव्सच्या हर्दीक शुभेचा

जून 1, 2007



पहिल्या पाव्सच्या हर्दीक शुभेचा …!!!!!!!!!!!!!