Archive for सप्टेंबर, 2007

मैत्री असावी अशी !!!!!!

सप्टेंबर 29, 2007
मैत्री असावी अशी
मैत्री असावी अशी मैत्रीसारखी
हसत राहणारी हसवत राहणारी
संकटकाळी हात देणारी
आनंदी समयी साद घालणारी
मनाची कवाडे उघडून डोकावणारी
काहीं गुपितांचे राखण करणारी
मन मोकळे करुन सारं सांगणारी
सांगता सांगता मोहीत करणारी
कधी कुणाला न लुटणारी
चांगल्याच कौतुक करणारी
तितकीच चूका दाखिवणारी
शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी

हसा आणि हसवा ……

सप्टेंबर 28, 2007

नमस्कार मंडळी !!!!
काय
माग कसे आहात ??? ठीक ना….
मग
गणपती च्या सुटटी नंतर सुरवात जोक्स नी……


खरंच खूप मी दमलो आहे!

सप्टेंबर 20, 2007

खुप खुप थकलो आहे,
जड जड ओझ्यांनी वाकलो आहे,
रण रण ऊन्हात सुकलो आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

भिज भिज पावसात भिजलो आहे,
थंड थंड थंडीत गारठलो आहे,
गरम गरम ऊन्हात भाजलो आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

सण सण सणाणत निघालो आहे,
सप सप वार कर सुटलो आहे,
गप गप मुकाट रस्ता चाललो आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

चिंब चिंब आठवणींनी भांबावलो आहे,
खुप खुप इच्छांनी वेढलो आहे
अफाट अफाट अपयशांनी खचलो आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

काळ्या काळ्या अंधारात उभा आहे,
उजळ उजळ प्रकाशाची गरज आहे,
टक टक नजर कुणाची वाट पाहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

कण कण मनाचा झिजला आहे,
क्षण क्षण आठवणींने झिजला आहे,
अश्रु अश्रु डोळ्यात मुरला आहे
खरंच खूप मी दमलो आहे!

मऊ मऊ बिछाना मी शोधत आहे,
शांत शांत झोपेची वाट मी पाहात आहे,
मंद मंद वा-याची झुळुक येत आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

……………………………

   Name: Nitin Salvi
   Email:nitin3_salvi[at]yahoo.co.in
   Mob: ९८९२०१९९०२

तराठ …!

सप्टेंबर 19, 2007

कसलंतरी दु:ख उराशी बाळगून,
दारुचे घोट घटाघट पिऊन,
त्याच नशेत तराठ होऊन,
माणुस जातो भलत्याच दुनयेत हरवुन!

दु:खनिवारणाची ही पध्दत कोणती,
झिंग आणणारी नशा कोणती,
हे वाईट सर्व जाणती,
तरीही पाउले त्याच गुत्त्यावर वळती!!

मग एखादयाचं मुल विचारतं,
आमच्या बाबांना पाहिलंत का?
कुणीतरी सांगतं – तिकडे पडलेत
नशेत फारच तराठ झालेत!!

मलं त्यांना उचलुन चालु लागतात,
ज्यांचा आधार हवा, त्यालाच आधार देत,
आशाळभुत नजर खाली बघत,
जो आधार देणार त्यालाच आधार देत!!!

घरी आणुन अंथरुणावर टाकला,
तो निवांतपणे शांतीने झोपला,
पण बायका-मुलांचा डोळा नाही लागला,
पुढे येणारा काळ दिसु लागला..!!!

खुप खुप विचार केला,
पण याचा अर्थ नाही कळला,
परिस्थितीचा अर्थ मनात सलला,
दैवाचा हा खेळ कुणाला कळला..!!!

……………………………

   Name: Nitin Salvi
   Email:nitin3_salvi[at]yahoo.co.in
   Mob: ९८९२०१९९०२

मैतर

सप्टेंबर 18, 2007

दोघांची दोन वेगळी घरं,
दोघांची दोन वेगळी कामं,
दोघेही एकमेकांपासुन पुर्ण वेगळे,
तरीही आपल्या मैत्रीचे रोप जगले!

नातं जसं रोपटं व जमिनीचं,
नाही येथे बंधन कशाचं,
नाहे येथे नातं रक्ताचं,
आज एक झाड मैत्रीचं!

बालपण आपण वेगळं जगलो,
तु होस्टेलात, मी इथंच शाळा शिकलो,
तरीही तु व मी कधी न विसरलो,
आज एक झाड मैत्रीचं!

दोघांत फरकही होत थोडा,
तु दिसतोस हत्ती तर मी घोडा
काहीजण म्हणायचे छान दिसतो जोडा,
आज एक झाड मैत्रीचं!

काळ असाच सरत राहील,
मैत्रीही अशीच वाढत राहील,
दोघांच्या मनात भक्कम राहील,
आज एक झाड मैत्रीचं !

Name: Nitin Salvi
Email:nitin3_salvi[at]yahoo.co.in
Mob: ९८९२०१९९०२

गणपती बप्पा मोरया ..!

सप्टेंबर 13, 2007

आईशप्पत

सप्टेंबर 13, 2007

aaishappat…….