Archive for ऑक्टोबर , 2007

सुविचार

ऑक्टोबर 20, 2007

Show/ Hide Image Version! [+ / -]

  • सगळे कागद सारखेच… त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते..!
  • रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसुनओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.
  • ड्रिंक्स घेतल्यावर न घेतलेल्या माणसापेक्षा जागरुक राहावं लागतं.
  • आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.
  • सगळे वार परतवता येतात पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही
  • कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपुर्वाई आहे.
  • रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगु शकतो, पण तुळस वॄंदावनात राहते. तिच्यापुढं आपल्यालाच उभंरहावं लागतं.
  • आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं – आपला उत्कर्ष होतोय.
  • ज्याच्या असण्याला अर्थ असतो त्यांचाच नसण्याची पोकळी जाणवते.
  • अत्तराची बाटली संपतानाच जपायची असते.
  • दु:ख पराभवाचं नसतं। फसवणुक करुन पराभव गळयात मारला जातो, त्याचं दु:ख होतं. कर्णाची बाजू अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आलं त्याचं वाईट वाटतं.

वरील सर्व विचार हे वेगवेगळ्या व्यक्तिंच्या नावाने आमच्याकडे आले आहेत…. पैकी, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, खांडेकर या काही मान्यवर व्यक्ती…. त्यामुळे [ लेखकांविषयी आपले ज्ञान दाखवत] उगाचच गैर-समज करुन घेऊ नये…!

मराठी चारोळी

ऑक्टोबर 16, 2007

Show/ Hide Image Version! [+ / -]

प्रेम आणि लग्न
यांत बरेच अंतर आहे
आनंद आधी आहे
पश्चाताप त्या नंतर आहे…

लग्नाच्या जोडप्यांकडे पाहत
रेखा मनात झुरते
म्हातारपणी तरी बच्चन भेटेल
म्हणुन रोज पुजाअर्चा करते….

लग्न या शब्दाचा अर्थ
आपण किती वेगळा लावतो
बायकोच्या आग्रहाला आणि त्रासाला
आपण संसार का म्हणतो…

गर्लफ्रेंड मल्लिका सारखी असावी
इथे प्रेत्येकाला वाटत असते
लग्नासाठी मुलगी बघताना
नजर मात्र ऐश्वर्याला शोधते…

प्रेयसी पत्नी झाल्यावर तिच्यातील
“बायको” जागी होते…

………………… धिरजसिंह मोहिते

आळशी माणसं…

ऑक्टोबर 15, 2007

Show/ Hide Image Version! [+ / -]

“आळशी माणसं खुप हुशार असतात”. माझ्या या वाक्यावर आईची प्रतिक्रिया ठरलेली आहे. “बरं बाई.तुमचा रेडा गाभणा. देतो, चांगलं दहा शेर दुध देतो.” आळशीपणा आणि हुशारी यांचं समीकरण जरीआईला पटलं नसलं तरी माझा यावर ठाम विश्वास आहे. माझ्या अनेक [आळशी] आप्तेष्टांचा या मताला सुप्त पाठींबा आहे हे मला ठाऊक आहे.

आळशी माणसं कधीही कौटन किंवा रंग जाणारे कपडे विकत घेत नाहीत. सिंन्थेटिक, म़ळखाऊ रंगाचे, मशिन वाश/ बाई वाश असेच कपडे घेतात. रिंकल फ्री कापड हा त्यांचा आवडता प्रकार. १-१ कपडा वेगळा धुणार कोण आणि कौटनच्या कपडयाला इस्त्री करणार कोण? एवढा सगळा विचार कपडे घेताना करावा लागतो आणि त्यासाठी चणाक्ष बुध्दी लागते. रात्री झोपायच्या आधी दिवा बंद करायलाउठायचं नसेल तर जवळ स्वीच घेण्याची व्यवस्था घराचं वायरिंग चालु असतानाच करुन घ्यावी लागते. इतक्या बारीक-सारीक गोष्टी लक्षात ठेवुन करणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही. म्हणजे नंतर नुसता हार घातला की काम झालं.

ही माणसं जेवतात अगदी सावकाश. यांच जेवण होइपर्यंत ताटं उचलुन झालेली असतात, उरलं सुरलं काढुन ठेवलेलं असतं. अगदी पुसुन घ्यायची वेळ झाली तर ताट हातात घेऊन जेवत बसतात. नंतर यांना काही काम पडत नाही. हे लोक बहुदा भात खात नाहीत. भाता आधीचं जेवण होईपर्यंत एतकाचेंगटपणा करतात की भाताची आणि झोपेची वेळ एकच येते. बरं भात खाल्ला नाही म्हणजे जाडी वाढत नाही आणि जाडी वाढली नाही म्हणजे व्यायाम करावा लागत नाही. चहा गाळल्यावर चोथा हातांनीकधी काढत नाहीत, त्यात पाणी घालुन परत गाळतात आणि तेच डस्ट-बीन वर आदळतात. देवालाही सोडत नाहीत. पुजेला बसताना पंचपात्रात पाणी घ्यायला नको म्हणुन सरळ देवाला नळाखाली धरतात. चेष्टा नाही – प्रत्यक्ष पाहिलं आहे.

हे लोक पब्लिकमध्ये मात्र प्रिय असतात. कधीही फारशी कटकट करत नाहीत. महिनोंमहिने यांचं पासबुक अपडेटेड नसतं. ते असावं असा त्यांचा हट्टही नसतो. बँकेत गेले आणि प्रिंटर बंद असेल तर सरळ बाहेर येतात. वाट बघत किंवा हुज्जत घालत बसत नाहीत. भाजी घेताना कोणती भाजी केवढ्याला बगैरे विचारत बसत नाहीत. सगळं घेऊन झालं की एकदमच कीती झाले ते विचारतात. जणु काही त्यांनीच आपल्याला गणित शिकवलंआहे अशा थाटात मान डोलवत पैसे देऊन मोकळे होतात. तो सुट्टे नाहीत म्हणाला तर उरलेले पैसे त्याला दान करतात. आपले पाकिट उलथं-पालथं करुन सुट्टे शोधायच्या किंवा शेजारच्या दुकानातुन सुट्टे करुन घ्यायच्याभानगडीत पडत नाहीत. त्यामुळे भाजीवाले, रिक्षावाले इ. लोक यांच्यावर सदैव खुष असतात. अशा लोकांमुळेचतर रिक्षा, टॅक्षी चालु आहेत. अहो, चितळे, वैद्य यंचा धंदा चाललाच नसता जर सगळ्याच बायकांनी मोदक, पुरणपोळी घरीच करायच ठरवलं असतं तर.

ही शोधाची जननी आहे” आळशी लोक काम बाकी छान करुन घेतात. उंटावरुन शेळ्य हाकायची सवय असते ना. आपलं काम समोरच्याकडुन कसे करुन घ्यावं हे त्यांना बरोबर कळते. आळशीपणा हा एक गुण “मॅनेजर” म्हणवुन घेणा-या प्राण्याकडे असणं आवश्यक आहे असं मला मनापासुन वाटतं. अति उत्साही मॅनेजर प्रत्येक-न-प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना फार इरीटेट करतो. खरंतर माणुस आळशी आहे म्हणुनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणे देत असते त्या मुंग्या, मधमाशा किंवा कोळ्यासारखं काम करत बसला असता तर त्यांचासरखाच राहिला असता. माझ्या मते, “गरज ही शोधाची जननी आहे” असं म्हणण्यापेक्षा “आळस ही शोधाची जननी आहे” असं म्हटलं पाहिजे.

पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन सांगायचे ठरवले असते तर पोस्ट, टेलिग्राम, ई-मेल या गोष्टी अस्तित्वात आल्याच नसत्या. रीमोट कंट्रोल, कौर्डलेस फोन यांची गरज किती होती बघा आणि त्यामागे आळस किती होता ते बघा…. आणि आता तुम्हींच सांगा – आळशीपणा आणि हुशारी यांच नातं आहे की नाही?

कविता …!

ऑक्टोबर 11, 2007

Show/ Hide Image Version! [+ / -]

शब्दाला शब्द जोडले की झाली कविता
वाक्याला वाक्य भिड़ले की झाली कविता
मनाशी मन जूळले की झाली कविता
आकाशी रंग उधळले की झाली कविता
मनाताल्या भावना व्यक्त केल्या की झाली कविता
शेवटी काय…
कवि मनाला जागें केले की झाली कविता

Name: मनीष खांडेकर
Email: khandekarmanish[at]gmail.com

चाहूल

ऑक्टोबर 4, 2007

पावलांची चाहूल लागली आणि मानाने झोके घेणे सुरु केले
पावले घरात आली आणि मन भरूं आले
मनाचा एकांत सम्पून सहवासने जागा केली
सोबत येणार या सुखांची मानाने यादी केली
क्षणिक असलेल्या ह्या नात्याची मानाने तयारी केली
परत येनार्या एकान्ताची मनाला जाणीव झाली
वेळ थाम्बावी अशी मानाने विनावणी केली
कालाने ती एइकावी अशी त्याला ही इच्छा होती
दोघांच्या सानिध्यात रात्र ही साथ देत होती
संथ पान्यावर होडी पण हेल्कावे खात होती
चंद्राच्या साक्षीने दोघानी शपथ घेतली
त्यांच्या ह्या शपथेने पाखरे ही घरत्यात शंतातेने झोपली

Name: मनीष खांडेकर
Email: khandekarmanish[at]gmail.com

तुझ्या शिवाय ..[मराठी कविता ]

ऑक्टोबर 3, 2007

आज तुला मी नको आहे, हे मला ही कळतयं,
तुझ्या बोलण्यातील राग दुखावतोय,
आणि उपासनेने मन जळतय.

एक दिवस असा होता, जेंव्हा तु माझ्या मागुन फिरायचास
माझा प्रत्येक शब्द, तु फुलासारखा जपायचास,
मला एकदा बघण्यासाठी, तासन तास वाट बघायचास
डोळ्यात डोळे घालुन माझ्या
स्वतःला त्यात शोधायचास.

पण आज का कोण जाणे, हे सारे बदललय,
माझं असं काय चुकलं की
तुझं माझ्यावरचं प्रेमचं संपलय?

मला जे समजायच ते मी समजली आहे,
आज तुला मी नको आहे,
हे तुझ्या वगण्यावरुन जाणवलं आहे

तरी त्यात तुझं सुख असेल
तर माझी काही हरकत नाही,
तु सुखी होणार असशील तर
मरणाही माझा नकार नाही.

पण तरीही मनात कुठे तरी वाटतयं,
तुला कधीतरी माझी आठवण नक्की येईल,
मला एकदा बघण्यासाठी तुझं मन अतुर होईल
पण तेंव्हा, तुला सावरायला, मी तुला दिसणार नाही,
कारण तुझ्यापासुन दुर राहुन
मी जास्त दिवस जगणार नाही…..

Name: Prasad Sakat
Email:prasad_sakat[at]yahoo.com
Mob: ९८६७०९२४८४

Chintoo….चींटू

ऑक्टोबर 3, 2007




आजोबा !!! Ajoba

ऑक्टोबर 2, 2007
जेवताना आजोबा लाडात येत,
मला आपल्या ताटातली भकर देत;
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत !

मी म्हणायची रागवूनः
“आजोबा, बॅड मॅनर्स,
व्हॉट आर यू डुइंग?”
आजोबांचं हसून उत्तरः
“आय अॅम जस्ट ढेकरिंग !”

आजोबांच्या खोलीत आता
धुकं… धुकं… धुकं…
आजोबांचं जग सगळं
मुकं…मुकं…मुकं…

आजोबांना पडलं होतं
भलंमोठं टक्कल !
आजोबा म्हणायचेः
“ज्याला असं टक्कल
त्यालाच असते अक्कल !”

मी खिजवून म्हणायचोः
“आजोबा, यमकासाठी
घ्या आता बक्कल !”
आजोबा मोठयाने ओरडून म्हणतः
“अरे साल्या यमक्या,
मला देतोस
धमक्या?यमकांच्या धंद्यामधे
मी आहे खमक्या !”

आजोबा आपल्याच नादात
स्वतःशीच गात असत,
गाता गाता मधेच थांबून
स्वतःशीच गोड हसत !

मी जवळ गेले की
मला म्हणतः
बेटा एक लक्षात ठेवः
एकटं एकटं जाता आलं पाहिजे;
स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे !”

मी गोंधळून विचारीः
“म्हणजे काय?”
आजोबा मोठयाने हसून म्हणतः
” म्हणजे काय? म्हणजे काय?
म्हणजे नाकात दोन पाय !”

“आजोबा, एक गोष्ट विचारु?”
“विचार बेटा!”
“आजोबा, तुम्हांला मैत्रिणी
होत्या का हो?”
“वा! वा! होत्या म्हणजे
होत्याच की !
एक ती अशी होती,
दुसरी ती तशी होती !”

इतक्यात खोलीत आजी यायची,
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची !
आजोबा स्वतःला सावरायचे,
चटकन विषय बदलायचे,
घसा खाकरत म्हणायचेः
“बेटा, तुला गीतेमधला
स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?”

आजोबा संध्याकळी
अंगणातल्या झाडाखाली
आपल्या आरामखुर्चीवर
एकटेंच बसत;
एकटक डोळे लावून
दूर कुठे बघत असत…
दूरदूरच्या ढगात असत,
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत !!

पाय न वाजवता मी हळूच
तिथे जाई,
त्यांच्या आरामखुर्चीमागे
उभी राही!
काय बघत असतील हे?
मी दूर पाहीः
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे,
तीच घरं…तीच झाडं…
सगळं अगदी तसंच असे !

पाय न वाजवता मी हळूच
परत मागे घरात यायची;
आजोबांची आरामखुर्ची
सावल्यांमधे बुडून जायची !

आजोबांच्या खोलीत आता
धुकं… धुकं… धुकं…
आजोबांचं जग सगळं
मुकं…मुकं…मुकं…

- मंगेश पाडगांवकर

Marathi PJ

ऑक्टोबर 1, 2007