सूर्य ..!

By majhablog

Show/ Hide Image Version! [+ / -]

तहानलेला सुर्य
क्षितिजावर बसुन
हळुच वाकतो
नदीत डोकावतो
नदीतलं पाणी
उष्ट करताना
सुर्याचं तेज त्यात सांडतं
त्या तेजोमय नदीत पुढे
सुर्य तसाच विरघळतो…!

………….. चक्रवर्ती

तुमचा अभिप्राय नोंदवा